Upendra Limaye : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये त्यांच्या बहुरंगी अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेत असतात. गेल्यावर्षी त्यांनी साकारलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील फ्रेडी पाटील या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘चौक’, ‘सावरखेड एक गाव’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपेंद्र लिमयेंची महत्त्वाची भूमिका असणारा पहिला तेलुगू चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या भूमिकेचं तसेच अभिनय शैलीचं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील कौतुक केलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ उपेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

उपेंद्र लिमये ( Upendra Limaye ) यात सांगतात, “नमस्कार, हा माझा पहिला तेलुगू व्यावसायिक चित्रपट. याचं नाव आहे संक्रांतिकी वास्तुनम. या चित्रपटाचं शूटिंग काल संपलं आणि आज मी या चित्रपटाचं डबिंग सुद्धा संपवलं आहे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये कधीही काल शूटिंग संपवून, लगेच आज डबिंग पूर्ण झालंय… असं झालेलं नाही. पहिल्यांदाच असं झालंय आणि हा एक अत्यंत समृद्ध करणारा व्यावसायिक अनुभव मिळाला. मला ही संधी दाक्षिणात्य लेखक-दिग्दर्शक अनिल रवीपुडी यांच्यामुळे मिळाली. तेलुगू इंडस्ट्री मधील ब्लॉकबस्टर लेखक-दिग्दर्शक अशी यांची ओळख आहे. सर, तुमचे खूप आभार तुमच्याबरोबर काम करताना खूप मजा आली.”

पुढे, दिग्दर्शक अनिल, उपेंद्र लिमये यांच्या कामाचं कौतुक करत म्हणाले, “उपेंद्र सरांबरोबर ( Upendra Limaye ) काम करून खूपच भारी वाटलं. हे किती भारी कलाकार आहेत हे मी शब्दात सांगूही शकत नाही. कोणतीही भूमिका ते अगदी सहज साकारू शकतात. त्यांचं टायमिंग कमाल आहे. सकाळी त्यांनी डबिंग सुरू केलं होतं आणि आता रात्रीचे १० वाजलेत. एवढा वेळ त्यांनी डबिंगसाठी काम केलंय. त्यांचं डेडिकेशन कमालीचं आहे. शिस्त, वेळेवर येणं…त्यांचं सगळं काही परफेक्ट असतं. या चित्रपटामध्ये तुम्हाला उपेंद्र सरांची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल.”

हेही वाचा : Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

“संक्रांतिकी वास्तुनम हा चित्रपट येत्या १४ जानेवारीला प्रदर्शित होतोय. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम आमच्याबरोबर ठेवा” असं आवाहन उपेंद्र लिमये ( Upendra Limaye ) यांनी प्रेक्षकांना व त्यांच्या चाहत्यांना केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upendra limaye first telugu film director praises him for great acting sva 00