अभिनेत्री उर्मिला कानिटकर मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारेला ओळखले जाते. ती सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असते. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबरोबरच तिच्या कामाबद्दलही माहिती देत असते. आता नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ब्रेकअप झाल्यावर काय करावं हे सांगितलं आहे.
उर्मिला सोशल मीडियावर एक रील पोस्ट केलं. हे रील पोस्ट करताना तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने लिहीलं, “ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला आणि फक्त फिल करा…” तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. तिने ही पोस्ट करण्यामागचं कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट ‘ऑटोग्राफ.’ या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचं नाव आहे ‘अधुरे-अधुरे.’ हे गाणं उर्मिलाने या रीलमधून सोशल मीडियावरून शेअर केलं आहे.
आणखी वाचा : “…म्हणून मराठीत काम करत नाही”; अखेर काजोलने सांगितलं कारण
हेही वाचा : उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतीतून ‘या’ कलाकारांनी अचानक घेतलेली एक्सिट ठरला चर्चेचा विषय
‘ऑटोग्राफ’ चित्रपटात उर्मिला कोठारे, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आणि मानसी मोघे स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडेने केलं आहे. येत्या ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उर्मिलाच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवलीय. चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.