Urmila Kothare Car Accident Video: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. काल शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याच समजतंय.

हेही वाचा –“माझी चूक झाली”, शूटिंग करूनही पैसे न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप; स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हणाली…

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे. आयएएनएसने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – “तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”

उर्मिला कानेटकर ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ती महेश कोठारे यांची सून असून आदिनाथ कोठारेची पत्नी आहे.