Urmila Kothare Car Accident : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त २८ डिसेंबरला समोर आलं. मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला. उर्मिलाच्या गाडीने दोन मुजरांना उडवलं. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. तसंच या अपघातात उर्मिला स्वतः आणि चालक जखमी झाले. त्यामुळे तातडीने जमखींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, या भीषण अपघाताप्रकरणी उर्मिला कोठारेच्या चालकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्री १२.५४च्या सुमारास झाला. उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना हा अपघात झाला. याआधी मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला जोगेश्वरी येथे उर्मिलाने सोडले. त्यानंतर ठाणे-घोडबंदर मार्गे घरी जात असताना कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालक गजानन पाल याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले.

hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Two Suspended in Hospital After video Shows Pregnant Woman Cleans Husband Bed After his Death
Woman Cleaning Husband Bed : धक्कादायक! पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले रक्ताचे डाग, कुठे घडली घटना?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Marathi actress megha dhade angry about Prajakta mali controversy
Video: “त्या रस्त्यावर बसलेल्या नाहीत…”, प्राजक्ता माळीबाबतच्या विधानावरून मेघा धाडे संतापली; म्हणाली, “तू घाबरून जाऊ नकोस”
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा – प्राजक्ता माळीबाबतच्या विधानाचा निषेध करून किरण मानेंची खोचक पोस्ट; म्हणाले, “अचानक समस्त महिला वर्गाविषयी पुळका…”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, “चौकशीदरम्यान चालक आणि अभिनेत्रीने सांगितलं की, एका वाहन चालकाने भरधाव वेगात येऊन त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. त्यामुळे त्या गाडीला धडकू नये म्हणून उर्मिलाचा चालक प्रयत्न करत असतानाच गाडीवरचा ताबा सुटला आणि ती उलटली. त्यानंतर गाडी एका बॅरिकेडला आदळली. त्यामुळे पुढे जाऊन गाडीने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं. यात सम्राटदास जितेंद्र नावाच्या मजुराचा मृत्यू झाला असून सुजन रविदास हा जखमी झाला आहे. तसंच जखमी झालेल्या उर्मिलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – “चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचा…”, प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी एकवटले मराठी कलाकार; निषेधार्थ केली सोशल मीडियावर पोस्ट

उर्मिला कोठारेच्या गाडी अपघाताप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवाय एमएच-४७-एजी-७६५७ नंबर असलेली ‘हुंदाई’ गाडी जप्त केली आहे. अपघाताच्या वेळी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? याचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले आहेत. या भीषण अपघातामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ईशा सिंह १५ वर्षांनी मोठा असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट? सलमान खानने नाव घेताच लाजली, म्हणाली, “तो माझा…”

दरम्यान, उर्मिला कोठारेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सहा महिन्यांपूर्वी तिच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली दोन वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत उर्मिलाने वैदहीची भूमिका साकारली होती. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेनंतर उर्मिला स्वतःचे डान्स वर्कशॉप घेऊ लागली. याचे व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Story img Loader