डान्सर गौतमी पाटील ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. पण या व्हिडीओवर युजर्स कमेंट करून तिला ट्रोल करत आहेत.

गौतमी पाटीलने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती ‘दिलदार मनाचा रुबाबदार’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत तिच्याबरोबर तीन लहान मुली देखील याच गाण्यावर डान्स करतात. त्याही मंचावर गौतमीबरोबर तिच्याप्रमाणेच डान्स करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी गौतमीवर टीका केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल

‘तू नाचलीस ना बास झालं… बाकीच्या मुलींना नको हे करायला लावू.. खरंच,’ ‘लहान मुली आहेत एवढी तरी अक्कल ठेव’, ‘तू नाच आणि अजून तुझ्या पुढं १० तयार कर नाचायला… काय जरातरी लाजावं की देशाचं भविष्य नाचवताना,’ अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. ‘गौतमी ताई तुम्ही नाचा. लहान मुली आहेत हो. विचार करा,’ ‘आदर्श कोणाकडून घ्यावा हे समजलं पाहिजे,’ ‘आताची पिढी कशाला नादाला लावतेस,’ ‘ही शिकवण देता का तुम्ही लहान मुलांना, कुठे चाललाय आपला महाराष्ट्र,’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Gautami patil troll
गौतमी पाटीलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, यापूर्वीही गौतमीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्याबरोबर लहान मुलगी मंचावर डान्स करताना दिसली होती. तिचे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लहान मुलींचं तिच्याबरोबर मंचावर नाचणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.

Story img Loader