महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरला सुरू आहे. या चित्रपटात उत्कर्ष शिंदे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या संदर्भातील त्याची एक नवीन पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या चित्रपटात उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे त्याला आलेले अनुभव तो चाहत्यांशी वरचेवर शेअर करत असतो. आता त्याने चित्रीकरणादरम्यान त्याला आलेला चाहत्यांचा अनुभव शेअर केला आहे.
उत्कर्षने आज त्याचा इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात तो स्कुटीवर एका व्यक्तीच्या मागे बसून शूटिंगला जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं, “नको व्हायला शूटिंगला लेट – म्हणून निघालो फॅन्सच्या स्कुटीवर थेट…कोल्हापूर रांगड्या मातीतल्या मवाळ, प्रेमळ माणसांचं शहर. तर झाल असं, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या आमच्या आगामी फिल्मचं शूटिंग कोल्हापुरात सुरु असताना वेळ मिळताच आम्ही जिमसाठी धावतो, नेहमी प्रमाणे प्रोडक्शनची कार सोबत असतेच पण त्या दिवशी फोर्ज फिटनेस कोल्हापूरमधून निघालो आणि कारचा प्रॉब्लेम झाला. मग काय आता शूटिंगला लेट होतं की काय ह्या टेन्शनमध्ये असतानाच, “सर आम्ही काही मदत करू का म्हणत तितक्यात काही फॅन्स सेल्फी काढण्यासाठी आलेच होते. आम्ही ड्रॉप करतो चला सर लेट नाही होऊ देणार. मग त्या दोन्ही मित्रांनी मला आणि माझ्या सोबतीच्या कलाकाराला लिफ्ट दिली.”
पुढे त्याने लिहिलं, “स्कुटीवर डबल सीट तेही फॅन्सच्या बरोबर तेही कोल्हापुरात अशी वेगळीच मज्जा अनुभवली. शिंदेशाहीचे फॅन्स फक्त प्रेमळच नाही तर जीव लावणारे आहेत हे नवनव्या अनुभवातून दरवेळेस मला दिसतंच. कलाकार फॅन्सचे मन जिकंतो म्हणून फॅन्सची गर्दी होते, फॅन्स सेल्फी घेतात, ऑटोग्राफ घेतात पण काही फॅन्स वेगळे असतात तेही त्या कलाकाराचं मन जिकतात. असेच हे कोल्हापूरमधील दोन फॅन्स ज्यांनी माझं मन जिंकलं. ह्या कोल्हापूरच्या मातीतच वेगळी आपुलकी आहे. सदैव माझ्या मनात वेगळी छाप असेल ह्या शहराची. छत्रपतींचा सहवास आणि प्रेम लाभलेलं हे शहर रांगड्या कणखर पण तितकेच प्रेमळ मऊ मनाच्या माणसंच.” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.