महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार दिसणार आहेत. तर त्यांच्याबरोबरच काही जण अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. आता या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतंच ज्योतिबाचं दर्शन घेतलं, तर त्याचबरोबर पंगतीत बसून जेवणाचा आस्वादही घेतला.
या चित्रपटात उत्कर्ष शिंदे साकारणार सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या कोल्हापूरला सुरू आहे. उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहत असतो. आता त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून या चित्रपटाच्या शूटिंगच्या प्रक्रियेत त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्याचं सांगितलं आहे.
आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले
त्याने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यावेळी होत या चित्रपटाची टीम ज्योतिबा देवस्थानला जाऊन जमिनीवर पंगतीत बसून जेवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “वेडात मराठे वीर दौडले सात”चं आमचं शूटिंग कोल्हापूरमध्ये करत असताना आमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर सर्व टीम मेंबर्स ला “दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थान”ला घेऊन गेले .त्यांच्या दिग्दर्शनात एक नट म्हणून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्या सारखं नाहीये . एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारांसोबत वेळ घालवता येतोय, प्रवीण तरडे दादा, सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र.”
पुढे त्याने लिहिलं, “ह्या सर्वांसोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनिवर पंगतीती बसून जेवता आलं. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घड्तायेत कि माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या. एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वांकडून. तुम्हा सर्व रसिक मायबापाच्या आशीर्वादामुळे हे शक्य होत आहे.” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर प्रतिक्रिया देत चाहते त्याचं कौतुक करत आहेत.