मराठी अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांची मतं मांडत असतात. राजकारणावरही ते भाष्य करत असतात. नुकतीच त्यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या काही पोस्टबद्दल विचारण्यात आलं, त्या पोस्टमागची कारणं वैभव यांनी सांगितली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कलावंत व्यक्त होत नाहीत म्हणून बोंब, व्यक्त झालेत तरी बोंब, ज्यांच्या लाभाचे ते कौतुक करणार, नाही ते बदनामी करणार, काय करायचं,” अशी एक पोस्ट मांगले यांनी केली होती. त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “या पोस्टवर लोकांनी मला किती जोडे मारलेत ते तुम्ही पाहिलं असेलच. पण याबद्दल बोलायचं झाल्यास हा ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा प्रश्न असावा. मी कलाकारांवर जबाबदारी अजिबात टाकू इच्छित नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही कलाकार आणि माणूस म्हणून असलेली त्याची वैयक्तिक मतं याच्यामध्ये गल्लत नका करू. जे मानवतेला हानिकारक आहे, जे समाजाला हानिकारक आहे अशी भूमिका जर कुठला कलाकार घेत असेल तर तुम्ही निश्चित त्याविषयी बोललं पाहिजे. पण अमूक अमूक एका घटनेबद्दल हे कलाकार बोललेच नाहीयेत हे योग्य नाही.”

“…मग ती विचारधारा गेली कुठे?” वैभव मांगलेंचा राजकीय पक्षांना सवाल; म्हणाले, “दुसऱ्या पक्षाचे लोक…”

पुढे वैभव मांगले म्हणाले, “मी कला दाखविण्याचं काम करतो, त्यामुळे त्यात जर त्रुटी असतील, मी काम नीट करत नसेल, चांगलं काम न करता मोबदला घेत असेल तर तुम्ही मला त्याविषयी जरूर बोला. कलाकाराने फक्त राजकीय भूमिका घ्यायची नाहीये किंवा कुठल्याही अशा समाजघटनेवर भूमिका घ्यायची नाहीये, ज्याचा राजकीय संबंध असेल. जिथे जिथे राजकारण असेल, तिथे तिथे कलाकारांनी कोणतीही भूमिका घ्यायची नाहीये. तुम्ही कुठल्याही बाजूने बोललात की तुम्ही इकडचे किंवा तिकडचे असता. आता हे खूप वाढलंय. तुम्हाला काही बोलायचीच सोय नाहीय. सुदैवाने आमच्या गावाकडे कधीच असं वातावरण नव्हतं,” असं मत त्यांनी मांडलं.

‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी तुफान कमाई, ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला

“२०१० पर्यंत या सगळ्या गोष्टींचा मागमूसही नव्हता. आता इतकं गढूळ वातावरण झालंय की विचारायला सोय नाही. महत्त्वाचं म्हणजे याचा सामान्य माणसाच्या जीवनाशी काहीच संबंध नाही. त्याला बाजारात गेल्यावर.१२० रुपये किलोच्या खाली भाजी मिळत नाही. तुम्ही हे कुठले प्रश्न आणलेत, ज्याचा आमच्या जगण्याशी काहीच संबंध नाही. मी आज कुठलीही भूमिका नाही घेतली म्हणून माझ्या जगण्यात काहीही फरक पडत नाहीये किंवा घेतली तरी फरक पडत नाहीये. कारण भाजी १२० रुपयांनाच मिळणार आहे. त्यामुळे मला सामान्य माणसांना विनंती करायची आहे की बाबांनो, या कशातच पडू नका. तुम्ही कुठलाही वाद तुमच्या डोक्यात आणू नका. तुमचे पूर्वज जसे गुण्या-गोविंदाने राहत होते, तसेच आपणही राहुयात हाच भाव डोक्यामध्ये ठेवुयात. हा अमूक जातीचा, धर्माचा, इकडचा, तिकडचा असं काही नाही. या सगळ्यामध्ये शिक्षक व पालकांची फार मोठी जबाबदारी आहे,” असं मत वैभव मांगले यांनी व्यक्त केलं.