Air Pollution In Mumbai : अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली सामाजिक व राजकीय मतं मांडत असतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यासंदर्भात वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करून नागरिकांना आवाहन केलं आहे.

हेही वाचा : माधुरी दीक्षितने ‘हम साथ साथ है’ चित्रपट का नाकारला? अभिनेत्रीने सलमान खानचा उल्लेख करत सांगितलेलं कारण…

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गेले काही दिवस मुंबईवर दिसणारी धुरक्याची चादर सातत्याने टिकून आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : अभिनय सोडणं, आमिर खानकडून मार्गदर्शन याबद्दल दर्शिल सफारीचं वक्तव्य; म्हणाला, “लोकांचा गैरमसज…”

वैभव मांगले यासंदर्भात लिहितात, “कळकळीची विनंती…मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित झाली आहे. कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका.” त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. वैभव मांगलेंच्या आधी यापूर्वी केतकी माटेगावरकरने मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रश्न उपस्थित करत महापालिकेला लक्ष घालण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : “हेल्मेट रागाच्या भरात फेकून…”, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, “आयुष्यात…”

Vaibhav Mangle
वैभव मांगलेंची पोस्ट

दरम्यान, वैभव मांगलेंच्या कामाबद्दल सांगायाचं झालं, तर नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘टाईमपास’, ‘शहानपण देगा देवा’, ‘रंपाट’, ‘देवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटाकातील भूमिकेला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाने पसंती दर्शवली होती.

Story img Loader