‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ यांसारख्या चित्रपटातून वैभव तत्ववादीने अभिनयाचा ठसा उमटवला. वैभवने मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका या बॉलीवूड चित्रपटांमधील वैभवने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

हेही वाचा- “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

मनोरंजन विश्वात काम करताना वैभवचं नाव अनेक मराठी अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. अभिनेत्री पूजा सावंत व वैभव तत्ववादीची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडली होती. पूजा सावंतबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. वैभव आणि पूजा एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. गेली अनेक वर्षं त्यांची मैत्री आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील ते एकत्र दिसतात. तर आता ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत वैभवने पूजाबरोबरच्या मैत्रीबाबत भाष्य केलं आहे.

वैभव म्हणाला, ” भूषणबरोबर पहिल्यांदाच मला वाटलं होत आम्ही दोघे चांगले मित्र बनू. पण पूजाबरोबर माझी सतत भांडण व्हायची. पूजा आणि मी डान्स रिआलिटी शो करत होतो तेव्हा सेटवर मला खायला खूप वेळ लागायचा आणि पूजाची त्यावरुन चिडचिड व्हायची. ती रागाने माझं ताट खेचून घेऊन जायची. मला त्यावरुन राग यायचा. तेव्हापासून आमची छोट्या छोट्या भांडणातून मैत्रीत रुपांतर झालं.

हेही वाचा- प्रसाद ओकचा नवा चित्रपट ‘जिलबी’च्या चित्रीकरणास सुरुवात; पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला…

दरम्यान “अनेक अभिनेत्रींबरोबर तुझं नाव जोडलं गेलं होतं. पूजाबरोबर अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्या खऱ्या होत्या की खोट्या?” असा प्रश्न एका मुलाखतीत वैभवला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत वैभव म्हणालेला, “आम्ही चांगले मित्र होतो आणि आहोत.”

Story img Loader