वैभव तत्ववादी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’ अशी अनेक चित्रपटांत काम करुन वैभवने अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सर्किट’ या चित्रपटातून वैभव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानिमित्ताने त्याने लोकसत्ता डिजिटल अड्डाला हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळा वैभव तत्ववादी अनेक मुलींचा क्रश आहे. पण एके काळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीचा वैभव क्रश होता. प्राजक्ताने प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. “वैभव तत्ववादी माझा एकेकाळी क्रश होता. मी एकदा आईला हा तुला जावई म्हणून चालेल का, असे देखील विचारले होते. कॉफी आणि बरंच काही’ नंतर तो माझा क्रश होता. पण त्यानंतर आम्ही एका चित्रपटासाठी एकत्र काम केलं. तेव्हा आम्ही चांगले मित्र झालो. आता तो माझा क्रश राहिलेला नाही,” असं प्राजक्ता म्हणाली होती.

हेही वाचा>> “दीपिकाला होणाऱ्या बाळाची काळजी नाही का?” पत्नीबाबत प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याला शोएबचं सडेतोड उत्तर, म्हणाला “तिच्यासाठी…”

प्राजक्ताच्या या वक्तव्यावर वैभवने लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये प्रतिक्रिया दिली. वैभव म्हणाला, “मला प्राजक्तानेच मुलाखतीतील तो व्हिडीओ पाठवला होता. मी तुझ्याबद्दल असं बोलली आहे, हे तिने मला सांगितलं. एका सुंदर मुलीने क्रश असल्याचं सांगितल्यावर एका मुलाच्या ज्या भावना असतील. त्याच माझ्या होत्या.” मराठी सिनेसृष्टीतील कोणी क्रश आहे का? असा प्रश्नही वैभवला विचारण्यात आला.

हेही वाचा>> लग्नानंतरही ऋषी कपूर यांची होती अफेअर्स, नीतू कपूर यांनीच केलेला खुलासा, म्हणाल्या होत्या ” त्यांना मी फ्लर्ट करताना…”

“सुरुवातीला काही अभिनेत्री क्रश होत्या. पण, आता त्या सगळ्या मैत्रिणी झाल्या आहेत. एका लग्नाची गोष्ट हे मी मराठीतील पाहिलेलं पहिलं मराठी नाटक होतं. ते नाटक पाहिल्यानंतर मला कविता लाड यांच्यावर क्रश होता. मी त्यांना ताई म्हणतो. पण, मी त्यांना अजूनही हेच सांगतो की, तुम्ही मराठीतील माझा पहिला क्रश होतात आणि राहाल,” असं वैभव म्हणाला.

हेही वाचा>> “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले, “मला…”

दरम्यान, वैभव तत्त्ववादी मुख्य भूमिकेत असलेला ‘सर्किट’ हा चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वैभव तत्ववादीसह अभिनेत्री ऋता दुर्गुळे व मिलिंद शिंदे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून आकाश पेंढारकरांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi reacted on prajakta mali statement actress said she had crush on the marathi actor kak