अभिनेता वैभव तत्त्ववादी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. नाटक, चित्रपट, मालिका आणि आता वेब सीरिज अशा चारही माध्यमातून वैभव प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातही त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच अभिनेता ‘कमांडो’ या हिंदी सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीरिजच्या निमित्ताने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत वैभवने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत कॉलेजच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : दुसऱ्यांदा गरोदर होती रानी मुखर्जी, पण गमावलं बाळ; खुलासा करत म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या…”

वैभव तत्त्ववादी आठवणी सांगत म्हणाला, “माझा जन्म अमरावतीमध्ये झाला त्यानंतर नागपूरमध्ये मी मोठा झालो. शिक्षणासाठी पुण्याला आलो तेव्हा मला दोन्हीकडच्या भाषेतील फरत जाणवला. माझ्या बोलण्यात नागपूरचा टच असायचा. याउलट पुण्याची मराठी ही पूर्णपणे वेगळी आहे. पुण्यात ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेत मला मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली होती. मी साकारत असलेल्या पात्राचे नाव अभि परांजपे असे होते आणि तो मुलगा सदाशिव पेठेमध्ये राहणारा होता असे नाटकात दाखवण्यात आले होते. माझी नागपूरी मराठी भाषा आणि सदाशिव पेठेमधील मराठी यामध्ये खूप जास्त तफावत होती.”

हेही वाचा : गोडीने सांगितलेली नाजूक गोष्ट

वैभव तत्त्ववादी पुढे म्हणाला, “मला तेव्हा ‘ळ’ चा उच्चार करता येत नव्हता, ते अक्षर बोलताच यायचे नाही. कॉलेजच्या नाटकाची लेखिका माझी मैत्रीण होती ती मला म्हणाली, ‘अरे आत सगळ्या वाक्यांमधून मी ‘ळ’ कसा काढू? काही वाक्य फार मार्मिक आहेत, ती बदलता येणार नाहीत.’ या सगळ्यामुळे माझ्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. नाटकाची रंगीत तालीम करताना मी माझे सगळे संवाद विसरलो. माझ्याकडून काहीच पाठांतर होत नव्हते. माझे सगळे वरिष्ठ तेव्हा डोक्याला हात लावून बसले होते.”

हेही वाचा : नरवीर तानाजींची शौर्यकथा उलगडणारा ‘सुभेदार’

“दुसऱ्या दिवशी नशिबाने व्यवस्थित प्रयोग झाला. आमच्या कॉलेजला पहिले बक्षीस सुद्धा मिळाले. पण, त्या अनुभवामुळे माझे संवाद मला आधीच द्या असे मी आज सगळ्या सेटवर असे सांगून ठेवतो. आता सरावाने ‘ळ’ चा गोंधळ दूर झाला आहे. माझ्या कॉलेजमधील वरिष्ठ लोकांनी ‘पळापळी हा रताळ्याचा खेळ नसून केळ्याचा खेळ आहे.’ हे वाक्य रोज बोलून घेतले. आता सरावाने मी व्यवस्थित उच्चार करू शकते.” असे वैभव तत्त्ववादीने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi reveals about his college days and drama competition sva 00
Show comments