मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये वैभव तत्त्ववादीचे नाव घेतले जाते. वैभवने आतापर्यंत नाटक, चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याचे बालपण आणि शिक्षण नागपूर येथे पूर्ण झाले. पुढे पुण्यात त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. त्याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता. पुण्यातून चार वर्षांनंतर मुंबईत आल्यावर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चित्रपटाचं नाव ‘सुभेदार’ का ठेवलं? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण; म्हणाले, “इतिहासातील एकमेव…”

वैभवने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा मुंबईत आल्यावर काय अनुभव आला याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, “नागपूर-पुणे त्यानंतर मुंबई ही तिन्ही शहरं एकमेकांपेक्षा फारच वेगळी आहेत. मुंबईत आल्यावर मी महेश मांजरेकरांच्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकात काम करत होतो. तेव्हा मी अंधेरीत राहायचो आणि ते प्रभादेवीला राहायचे. आम्हाला तालमीला १० वाजता बोलावले जायचे. त्यामुळे तेव्हा मी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली. सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना अशा दोन्ही वेळी मला गर्दीतून प्रवास करावा लागायचा. मुंबईच्या लोकलचा अनुभव नसल्याने सुरुवातीला या गोष्टी फार जड गेल्या.”

हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले हास्यजत्रेचे कलाकार! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

वैभव पुढे म्हणाला, “गर्दीमुळे तीन-तीन लोकल मी सोडून द्यायचो. पैशांचे पाकिट, मोबाइल चोरी होईल याची भीती वेगळी असायची. त्यावेळी मित्रांनी मला बॅग समोर लावायची आणि ट्रेनमध्ये चढायचे असा सल्ला दिला. त्याच बॅगेत तू मोबाइल फोन आणि पाकिट ठेवत जा…अशा सगळ्या टिप्स मित्रांनी दिल्या होत्या.”

हेही वाचा : Video : “जय शिवराय!”, ‘सुभेदार’ चित्रपटातील कलाकारांसह मरीन ड्राईव्हवर थिरकली तरुणाई, व्हिडीओ व्हायरल

“अंधेरी स्थानक आले की, लोकलच्या गर्दीतून आपोआप बाहेर ढकलला जायचो. संघर्ष काय असतो हे मला मुंबईत आल्यावर समजले. मुंबईवर माझे प्रचंड प्रेम आहे. पण, अजूनही जेव्हा मी छोट्या शहरांमध्ये शूटिंगला जातो तेव्हा माझ्या मनात जास्त आपुलकीची भावना असते. त्या छोट्या शहरांना मी जास्त कनेक्ट होतो”, असे वैभव तत्त्ववादीने सांगितले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi reveals about his struggle days and shared old memories sva 00
Show comments