मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वंदना गुप्तेंना ओळखले जाते. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी शशी नावाचे पात्र साकारले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेच सगळीकडे कौतुक करण्यात आलं.
दरम्यान काही दिवासांपूर्वी वंदना गुप्ते यांनी अवधूत गुप्ते यांच्या खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अवधूतने त्यांना तुमच्या नवऱ्याची तुम्हाला कोणती सवय सगळ्यात जास्त खटकते? असा प्रश्न विचारला. याला उत्तर देत वंदना गुप्ते म्हणाल्या, त्याच स्वयंपाकघरात लूडबूड करणं मला बिलकूल आवडत नाही. जेव्हा मी मुलींना सांगते आपल्या आज हे जेवण बनवायचं आहे. तेव्हा तो फोन करुन मेनू चेंज करायला लावतो. मला त्याची ही सवय खूप म्हणजे खूप खटकते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वंदना गुप्ते यांनी आपल्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी त्यांनी पती शिरीष गुप्ते यांच्याशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. मोजक्याच लोकांमध्ये आणि घरगुती पद्धतीने त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता.
हेही वाचा- “भूतकाळात घडलेल्या गोष्टी…”, उमेश कामतने नातं चांगलं ठेवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला
वंदना गुप्ते यांनी अनेक नाटक, मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘फोटोकॉपी’, ’66 सदाशिव’, ‘वेल डन बेबी’, ‘डबल सिट’, ‘मातीच्या चुली’, ‘बे दुणे साडे चार’, ‘टाईनप्लीज’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘बकेट लिस्ट’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘व्हॉट्सअप लग्न’, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केलं आहे.