‘साथी’, ‘अफलातून’, ‘गंमत जंमत’, ‘घर जमाई’, ‘तिरंगा’, ‘परदेसी’, ‘हनिमून’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘भुताचा भाऊ’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘माल मसाला’, ‘ऐकावं ते नवलच’ अशा अनेक चित्रपटांतून काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी १०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले आहे. त्याबरोबरच त्यांनी मालिकांत साकारलेल्या भूमिकांनादेखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. वर्षा उसगांवकरांनी महाभारत या मालिकेत साकारलेल्या उत्तरा या पात्राचे मोठे कौतुक झाले होते. नुकत्याच त्या बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून त्या सतत चर्चांचा भाग झाल्याचे पाहायला मिळाले.

वर्षा उसगांवकरांनी सांगितली आठवण…

नुकतीच वर्षा उसगांवकरांनी ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठी ५ च्या घरातील एक सदस्य म्हणून प्रवास कसा होता. घरातील इतर स्पर्धक, त्यांचा खेळ, स्वभाव अशा अनेक गोष्टींबद्दल वर्षा उसगांवकरांनी वक्तव्य करीत त्यांचे मत मांडले आहे. त्याबरोबरच त्यांना काही गाण्याचे स्क्रीनशॉट्स दाखवण्यात आले. त्या गाण्याची आठवण त्यांना सांगायची होती. त्यांना जेव्हा ‘बोंबाबोंब’ चित्रपटातील स्क्रीनशॉट दाखवण्यात आला, तेव्हा त्या चित्रपटातीला गाण्याची आठवण सांगताना वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील ‘ना सांगताच आज हे कळे मला’ हे अशोक आणि माझं चर्चित गाणं आहे. हे सुपर डुपर हिट गाणं आहे. या गाण्यात अशोक थोडासा ताठ वाटतो. याचं कारण म्हणजे तो एका खूप गंभीर अपघातातून बाहेर आला होता. तो एक चमत्कार होता. त्यानंतर ‘ना सांगताच आज हे कळे मला’ हे अशोकनं केलेलं पहिलं गाणं”, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

त्याबरोबरच ‘चोरीचा मामला’ या गाण्याची आठवण सांगताना त्यांनी म्हटले, “सचिन पिळगांवकरनं स्वत: नृत्यदिग्दर्शन केलं आहे. मला जर रिहर्सल जमली नाही, तर तो म्हणायचा की, कर कर तालीम कर. चार, पाच, सहा हजार वेळा कर. तो मजा करायचा.”

हेही वाचा: भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये वर्षा उसगांवकर कोणत्याही गटात सामील न होता, स्वतंत्रपणे खेळताना दिसल्या. त्यांच्या खेळाचे प्रेक्षकांकडून मोठे कौतुकही झालेले दिसले. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी वर्षा उसगांवकर या सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी माई ही भूमिका साकारली होती. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Story img Loader