अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही काळापासून सातत्याने त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. दोघांचा पहिलाच एकत्रित मराठी चित्रपट. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलीया आता मराठी मालिकेत दिसणार आहे.
सध्या हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. रितेश जिनिलीयाच्या वेड चित्रपटाच्या नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांनमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत जिनिलीया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. रछोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.