रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. तर या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. नुकताच या चित्रपटाने ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम मोडत एकाच दिवशी ५.७० कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘वेड’ या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं या त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटी कमाई केली आहे.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रतिसादामुळे ‘वेड’ या चित्रपट आणखी एक विक्रम नोंदवण्यात यशस्वी झाला आहे. कालपर्यंत या चित्रपटाने कमावलेल्या एकूण रकमेचा आकडा ३५.७० कोटी झाला. फक्त ११ दिवसांत ३५.७० कोटी कमावणारा रितेशचा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हा रेकॉर्ड आधी ‘लय भारी’ चित्रपटाच्या नावे होता. तर ती जागा आता ‘वेड’ने घेतली आहे. ‘वेड’ हा रितेश देशमुखचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकएण्डला शुक्रवारी २.५२ कोटी, शनिवारी ४.५३ कोटी आणि रविवारी ५.७० कोटींचा गल्ला जमवला. तर सोमवारी (काल) या चित्रपटाने २.३५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा : ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

हेही वाचा : अभिषेक बच्चनलाही रितेश-जिनिलीयाने लावलं ‘वेड’, म्हणाला, “तुम्ही दोघांनी…”

या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.