रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाला मोठं यश मिळताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर तिसऱ्या वीकेण्डला या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला होता. आता रविवारी त्यात मोठी भर पडली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या अहवालानुसार या चित्रपटाने शुक्रवारी १.३५ कोटींची, तर शनिवारी २.७२ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : ‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हा चित्रपट शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी आणखीन जास्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. या चित्रपटाने रविवारी २.७४ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४७.६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करणार आहे.

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. या चित्रपटाची कथा कलाकारांचा अभिनय यातील संवाद गाणी या हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडलं आहे.

हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘वेड’ या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved film collected good amount on the third weekend rnv