रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं करुन सोडलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला कायम आहे.

‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला. प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही ‘वेड’ची यशस्वी घौडदोड सुरुच आहे. या चित्रपटाने दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने सैराट चित्रपटालाही मागे टाकलं आहे. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणार हा मराठीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”

हेही वाचा>> नवीन गाण्यामुळे ट्रोल झाल्यानंतर अमृता फडणवीसांनी बनवला रील व्हिडीओ, डान्सही केला, म्हणाल्या…

हेही वाचा>> “ट्रॉफीवर नाव कोरल्यावर गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती?”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर म्हणाला…

‘वेड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून रितेश देशमुख भावूक झाला आहे. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार…’वेड’ चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. जिनिलीया देशमुखनेही चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Story img Loader