अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही काळापासून सातत्याने त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. दोघांचा पहिलाच एकत्रित मराठी चित्रपट. आता या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – मुंडावळ्या बांधून नवरी बाई तयार, हार्दिक जोशी व अक्षय देवधरच्या लग्न विधींना सुरुवात, पाहा खास झलक
‘वेड तुझा’ असं या चित्रपटामधील गाण्याचं नाव आहे. हे गाणं २९ नोव्हेंबरला (मंगळवारी) सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या गाण्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये रितेश अभिनेत्री जिया शंकरबरोबर रोमान्स करताना दिसत आहे.
“वेड तुझा विरह वणवा” असे या गाण्याचे बोल आहेत. अजय-अतुलच्या आवाजातील हे गाणं खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या गाण्याची वाट पाहत आहेत. तर सिद्धार्थ जाधवने “जबरदस्त सर” अशी या टीझरवर कमेंट केली आहे.
आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली
या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.