महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारताना दिसणार आहे. बिग बॉस फेम विशाल निकमचीही चित्रपटात वर्णी लागली आहे.
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विशाल ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात चंद्राजी कोठार यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील गाण्याची झलक शुभारंभ सोहळ्यात दाखवण्यात आली. विशाल निकमसह महेश मांजरेकर यांची मुलगी गौरी इंगावलेही चित्रपटात झळकणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यातील एक व्हिडीओ गौरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा >> “भाड्याने बॉयफ्रेंड आणि पती…”, राखी सावतंच्या वक्तव्यावर शर्लिन चोप्राचं प्रत्युत्तर
हेही वाचा >> ड्रेसला सेफ्टी पिन लावल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”
विशाल निकमने या व्हिडीओमध्ये घेतलेल्या डायलॉगची ही प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होत आहे. “ए सुगंधा…आता एवढ्यात लगीन न्हाय गं. आधी स्वराज्य…मग करू की एकदम थाटामाटात लगीन. कारण महाराजांनी पेटवलंय स्वराज्याचं रगात…ए बेहलोल आम्ही सात शिवभक्त पाठवू तुला ढगात”, असा डायलॉग विशाल व्हिडीओमध्ये घेताना दिसत आहे.
हेही पाहा >> Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. विशाल निकमसह बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणेही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि राणादा फेम हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहेत.