मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटातील इतर कलाकारांचा लूकही समोर आला. महेश मांजरेकर यांची लेकही या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

आणखी वाचा – “मराठी योद्धा जगासमोर…” ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत प्रवीण तरडे यांची प्रतिक्रिया, महेश मांजरेकरांचं केलं कौतुक

प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबरीने महेश मांजरेकर यांचा लेक सत्य मांजरेकरही या चित्रपटामध्ये ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. आता त्यांच्या लेकापाठोपाठ महेश यांची मुलगी गौरी इंगवलेही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये काम करताना दिसेल.

गौरीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या चित्रपटामधील लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती फारच गोड दिसत आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीही तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. गौरीने फोटो शेअर करत म्हटलं की, “‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला अभिमान आहे.”

आणखी वाचा – अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा

गौरीने याआधी ‘दे धक्का २’, ‘पांघरुण’ चित्रपटामध्ये काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केले होते. ती उत्तम डान्सरही आहे. आता या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल गौरीही फार खूश आहे.

Story img Loader