मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता. नुकतंच त्यांच्या लग्नापूर्वी घडलेला एक किस्सा समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. अशोक सराफ यांनी नुकतंच त्यांच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या ‘बहुरूपी’ या पुस्तकात याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “…त्यावेळी आम्ही मुलाला बिस्कीट पाण्यात बुडवून खायला दिलं होतं”, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

“मला आणि निवेदिताला लग्नानंतर वर्षभरातच अनिकेत झाला. ‘आमच्यासारखे आम्हीच’ या चित्रपटाचे डबिंग त्यावेळी सुरु होे. ते सुरु असताना अनिकेतचा जन्म झाला. त्यामुळे या चित्रपटाचे डबिंग निवेदिताची यांची बहिण मीनलने केले होते.

निवेदिता, त्यांची आई आणि बहिण यांचा आवाज अगदीच सारखा आहे. त्यामुळे अनेकदा गोंधळायला होतं. लग्नाच्या आधी मी एकदा निवेदिताला फोन केला होता. त्यावेळी अर्थात टेलिफोन होते. तेव्हा मी छान रोमँटिक बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मध्येच समोरुन आवाज आला. “आहो, मी निवेदिताची आई बोलतेय, थांबा हा निवेदिताला बोलवते”, असं तिच्या आईने म्हटले. तिच्या आईचा हा आवाज ऐकल्यावर मी टेलिफोनसह खाली पडायचा बाकी होतो, असे अशोक सराफ यांनी त्यात नमूद केले आहे.

आणखी वाचा : “माझा मित्रच कधी सासरा…” अशोक सराफ यांनी सांगितला बायकोच्या वडिलांना पहिल्यांदा भेटल्याचा किस्सा

दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केलं. त्यानंतर त्या दोघांनी मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणाने लग्नही केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor ashok saraf share phone call story with nivedita saraf nrp