मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी, मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.
आणखी वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब
अभिनेते रवींद्र महाजनी यांचा तळेगाव येथील राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. साधारणपणे तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्या घटनेची माहिती मिळताच रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर घटनास्थळी पोहोचला होता. या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. रवींद्र महाजनी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले.
“आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”
रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीयांसह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते रमेश परदेशी हे अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.