Varad Chawan : मराठी सिनेविश्वाला लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण यांसारखे अनेक दिग्गज कलाकार लाभले. या कलाकारांची जागा आजही कोणी घेऊ शकणार नाही. वैविध्यपूर्ण चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून अभिनेते विजय चव्हाण यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. २०१८ मध्ये या दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला होता. आज त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अभिनेता वरद चव्हाण इंडस्ट्रीत सक्रिय आहे. पण, अनेकदा या झगमगत्या दुनियेत काम मिळण्यासाठी धडपड करावी लागते, अपमानास्पद वागणूक मिळते असे धक्कादायक खुलासे वरदने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.

वरदने वडिलांना अभिनयाच्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा…

वरद चव्हाण म्हणाला, “या इंडस्ट्रीत इतके वर्षे काम करताना कधीच मी विजय चव्हाण यांचा मुलगा आहे अशी ओळख सांगितली नाहीये. मी जेव्हा बाबांना मला या प्रोफेशनमध्ये करिअर करायचंय हे सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते, सर्वात आधी डिग्री घे… आणि मग या क्षेत्रात येते. महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेऊ नकोस. मी तुला लाँच करेन, तुझ्यासाठी फायनान्सरकडे मी जाईन, तिथे तुलाही घेऊन जाईन वगैरे अशी कोणतीही अपेक्षा ठेऊ नकोस. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मी ‘बीएससी कॉम्प्युटर सायन्स’मध्ये शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी बाबांबरोबर अनेकदा शूटिंग सेटवर जायचो. तिथे जाऊन मी स्वत: दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटलोय, या क्षेत्रात करिअर करायचंय सांगून माझे फोटो वगैरे दिले होते. माझं बाबांबरोबर सेटवर जाणं वाढलं त्यामुळे लोक बोलायचे, ‘विजय चव्हाणांनी स्पॉटबॉय ठेवलाय वाटतं’ पण, हेच मी त्यांच्या मुलांच्या बाबतीत बोललो असतो तर त्यांना रुचलं असतं का? जेव्हा समोरच्या लोकांना समजायचं मी विजय चव्हाण यांचा मुलगा आहे तेव्हा अनेकदा का क्षेत्रात येतोय? असं मला सांगायचे, ‘न’ ची बाराखडी सुरू व्हायची. माझं या क्षेत्रात कोणीच स्वागत केलं नाही.”

Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय…
sonali kulkarni bought new new mercedes benz car
सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?
Vaideshi Parshurami
वैदेही परशुरामीचा लाइफ मंत्रा काय आहे? अभिनेत्री म्हणाली, “तर मग पश्चात्ताप…”
Uttam Jankar On Mahayuti Government
Uttam Jankar : “तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय चर्चांना उधाण
Who is Sivasri Skandaprasad singer engaged to BJP MP Tejasvi Surya
भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती

इंडस्ट्रीत मिळणाऱ्या कामाबाबत स्पष्ट मत मांडताना वरद म्हणाला, “मी शूटिंगच्या सेटवर सर्वांशी हसुनखेळून असतो पण, त्यानंतर पॅकअप झालं की, मी घरी येतो. कारण, अर्थात घराची ओढ जास्त आहे. माझे बाबाही असेच होते. या इंडस्ट्रीत माझे हक्काचे मित्र असे कोणीच झाले नाहीत. मी कदाचित स्वभावाने तितका सोशल नसेन म्हणून असं झालं असेल…यावर मी नक्की काम करेन. आपलं घरं चालवण्यासाठी, कुटुंबासाठी पैसा लागतो पण, पैसा कमावण्यासाठी काम पाहिजे. मी आशा करतो की, आज ना उद्या एखाद्या चांगल्या भूमिकेत मी तुमच्या भेटीला येईन.”

अनेकदा ऑडिशन दिल्यावर लूक टेस्ट होते…कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेतली जाते. तुम्हाला कळवतो सांगितलं जातं आणि मग आपण त्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत असतो मग, थेट टीव्हीवर त्या मालिकेचा प्रोमो दिसतो. अनेकदा अशाप्रकारे रिप्लेसमेंटचा अनुभव आल्याचंही अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितलं.

मला काम द्या…वरदने व्यक्त केली खंत

“माझ्या आयुष्यात काम न मिळण्याच्या दोन फेझ आल्या. २०१५ मध्ये असं झालं होतं… जेव्हा मला कोणाचे कॉल येत नव्हते, काम नव्हतं…मला वाटलं होतं करिअर संपलं ही होती पहिली फेझ. यानंतर २०२२ पासून म्हणजे ‘आई मायेच कवच’ ही मालिका संपल्यापासून गेल्या दोन वर्षात मी संघर्ष अनुभवला. यावेळी मला कॉल आले, ऑडिशन झाल्या मग परस्पर कळतं आपल्याला रिप्लेस केलंय. या दोन वर्षात खरंच खूप गोष्टी मला समजल्या. मला माझ्या कुटुंबीयांनी या काळात खूप सपोर्ट केलं. या दोन वर्षांच्या काळात मी पुस्तकवाचनाकडे वळलो. माझं युट्यूब चॅनेल सुरू केलं. माझं इतकंच म्हणणं आहे मला काम द्या, माझी कसलीच अपेक्षा नाही. मला साजेशी अशी कोणतीही भूमिका मी करेन…ऑडिशन सुद्धा देतो. कारण, आजकाल अनेक लोक ऑडिशन देत नाहीत पण, माझा तो सुद्धा हट्ट नाहीये. मला भरपूर काम करण्याची इच्छा आहे यासाठी काम मिळालं तर पाहिजे.” असं सांगत वरदने खंत व्यक्त केली आहे.

Story img Loader