मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज (२४ ऑगस्ट रोजी) निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सकाळी ७ वाजता त्यांचं राहत्या घरी निधन झाल्याची माहिती त्यांचे सुपूत्र अजिंक्य देव यांनी दिली आहे. आईच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं अजिंक्य यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Seema Deo Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

“आज माझ्या आई सीमा देव यांचं निधन झालं. आज सकाळी ७ वाजता ती गेली. गेली ३-४ वर्षे ती अल्झायमरने ग्रस्त होती आणि तिला पूर्ण विस्मृती झाली होती. बाबांना जाऊन आता दीड-पावणेदोन वर्षे झालीत. आईला काही आठवत नव्हतं, काही कळत नव्हतं पण ती आमच्याबरोबर होती. मात्र आता आई-बाबा दोघेही नाहीयेत. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात एवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ते मी सांगू शकत नाही,” असं अजिंक्य देव म्हणाले. सीमा देव दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रमेश देव-सीमा देव आणि त्यांची अजरामर प्रेमकहाणी!

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress seema deo son ajinkya deo reaction on mother death hrc