‘पिंजरा’, ‘कलावंतीण’, ‘भुजंग’, ‘एक होता विदूषक’, ‘हळदी कुंकू’, ‘राखणदार’, ‘लपाछपी’, अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक सध्या चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ५७वा ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी उषा नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हापासून उषा नाईक विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखती देताना दिसत आहेत. यादरम्यानच उषा नाईक यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, असं स्पष्टच उषा नाईक म्हणाल्या. त्यांनी असं नेमकं वक्तव्य का केलं? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उषा नाईकांनी सांगितलं पुरस्कारांचं राजकारण, म्हणाल्या, “दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्यात…”

नुकतीच उषा नाईक यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखती दिली. यावेळी त्यांना विचारलं गेलं की, तुम्ही आजवरच्या प्रवासात अनेक चित्रपट केले. विविधांगी भूमिका साकारल्या, ज्या वाखाणण्याजोगा होत्या. पण बऱ्याच चित्रपटात तुमचे कॅमिओ आहेत, मोठ्या भूमिका नाहीत, असं का? या प्रश्नाचं उत्तर देत उषा नाईक म्हणाल्या, “त्याचं कारण मला माहिती नाही. मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की, माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आलं. मी नाईक आहे. मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं. पण माझं तसं नाही झालं. मी नेहमीच सांगते. माझं असं म्हणणं आहे, या वेळेला, या वयाला आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पूर्वी बोलत नव्हते आता मी बोलायला लागले आहे. ते पण स्पष्ट बोलते.”

हेही वाचा – फ्लॉप चित्रपट, पतीवर छळाचे आरोप अन्…; ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर भारतीय सौंदर्यवतीचं करिअर ठरलं अपयशी, सध्या काय करते? 

पुढे उषा नाईक म्हणाल्या, “एकतर माझा कुणी गॉडफादर नाही. छोट्या कुटुंबातून आले आहे. देखावा कसा करायचा? हे माहित नाही. फार आपण कोणीतरी आहोत, मला काहीतरी मिळालेलं आहे, मी बरंच काम केलंय हे दाखवायची सवय नाही. तेव्हा नव्हती आणि आजही नाही. कदाचित ही सवय मला पुढे देखील नसणार. कारण मी आध्यात्मिक आहे. माझ्या गुरुंच्या अध्यात्मात माझी मनाची जडणघडण होतेय. त्यामुळे तिथे बाह्य रंगाला काहीच किंमत नसून अंतरंगाला किंमत असल्यामुळे कदाचित त्या गोष्टीचं मला फारस मौल वाटतं नाही. फक्त काम करत राहणं, चांगलं काम येईल ते स्वीकारणं आणि पुढे जाणं. एवढंच मी शिकत आलीये आणि कदाचित मी मरेपर्यंत हेच करत राहीन. मला बरीच पारितोषिक मिळाली. आता अण्णांच्या (व्ही. शांताराम जीवनगौरव) नावाने पुरस्कार मिळाला. तर मला त्याचं जास्त नवलं वाटतं नाही. माझी कारकीर्द तेवढी झाली होती म्हणून मला पुरस्कार मिळाला.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress usha naik told how she got rejected because of her surname pps
First published on: 10-03-2024 at 18:37 IST