मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दादर अभिमान गीताची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे प्रणिल हातिसकर यांनी एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या गाण्यात जयंत सावरकर यांनीही भूमिका साकारली होती. त्यादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पुलंचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा कलावंत काळाच्या पडद्याआड

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Top 5 Misal You Must Try in Pune
पुण्यातील ‘या’ पाच लोकप्रिय मिसळ तुम्ही खाल्ल्या का? Video होतोय व्हायरल
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli was called vahini by paparazzi video viral
Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”

यावेळी जयंत सावरकर हे दादरबद्दलच्या आठवणी सांगताना दिसत आहे. ते त्यांच्या आईला फोन करत दादरमध्ये काहीच बदल झालेले नाही, असे सांगत आहेत. यावेळी ते भावुक झाल्याचेही दिसत आहेत.

जयंत सावरकर काय म्हणाले?

“आई ऐकतेस ना, अगं दादरला स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेलो होतो आणि आत्मा अगदी तृप्त झाला. दादरला सगळं आहे तसंच आहे, काहीही बदल नाही. आपलं विसावा हॉटेलच्या समोरचं गोल देऊळ, त्या जवळच्या सर्व भरलेल्या गल्ल्या, भाजीबाजार अगदी सगळं तसंच आहे. त्यात काहीही बदलेले नाही. त्यावेळी २५ पैशाला ५ लिंब मिळायची आता २५ रुपयाला… भाव वाढले, पण स्थायी भाव सर्व तसाच आहे.

माणसं नेटवर्कमध्ये आहेत, पण कोणी कनेक्टेड नाहीत. तुझ्या माझ्यासारखं कनेक्शन आतून असावं लागतं. अधूनमधून आठवण काढून तुला त्रास देत राहिन”, असे त्यांनी या संभाषणावेळी म्हटले.

आणखी वाचा : “अण्णा सगळ्यांना…” जयंत सावरकरांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा, सुकन्या मोनेंची भावुक पोस्ट

दरम्यान जयंत सावरकर यांना ‘अण्णा’ या नावाने हाक ‘मारायचे. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रगल्भ अभिनयाचा ठसा उमटवला.

वयाच्या विसाव्या वर्षी, १९५४ सालापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले.