Marathi Actress Prema Sakhardande Passed Away: मराठी सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले आहे. अनेक नाटकं, मराठी मालिका, मराठी चित्रपट व हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रेमा साखरदांडे यांची प्राणज्योत मालवली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. प्रेमाताई नावाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाणाऱ्या प्रेमा साखरदांडे या हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) नावाने ध्वनिमुद्रिका तयार करणाऱ्या वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या.
प्रेमा साखरदांडे या मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी ‘स्पेशल २६’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’, ‘सावित्री बानो’, ‘मनन’, ‘माझे मान तुझे झाले’, ‘बेट’, ‘फुल ३ धमाल’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून भूमिका केल्या. ‘प्रपंच’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते. रंगभूमी आणि जाहिरातीत ही त्या लोकप्रिय होत्या. त्यांची कन्या क्षमा साखरदांडे यांनी नाटकांत कामे केली आहेत.