विद्याधर उर्फ बाप्पा जोशी हे मराठी मनोरंजन विश्वात विविधांगी भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणून ओळखले जातात. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विद्याधर जोशींना इंडस्ट्रीत प्रेमाने बाप्पा असं म्हटलं जातं. सध्या ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विद्याधर जोशींनी या पोस्टमध्ये त्यांना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

बाप्पा जोशी यांची पोस्ट

गेली दोन-तीन वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती ती आज दत्त जयंतीच्या निमित्ताने करतो…मी राहतो त्याच्या पलीकडे दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, शिवजयंती (वर्षातून दोनदा), दत्त जयंती, हनुमान जयंती, कृष्णजन्म, राम जन्म (हा अलीकडे जोरात) आणि इतरही काही दिवशी सत्यनारायणाची महापूजा होते. लाऊडस्पीकरवरून मुलायम आवाजात मोठ्यांनी पूजा सांगितली जाते. त्याचा मला पूर्वीपासून त्रास व्हायचा. तो मी बोलूनही दाखवायचो..पण गेली काही वर्ष तो बोलून दाखवला तर माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही आणि पर्यायाने इतर प्रकारचा द्रोही ह्या नजरेने बघायला लागले आणि आधी ‘ह्याच्यासारख्यांना कापलं पाहिजे’ असं काहीसं म्हणायला लागले!!

मी काय आयडिया केली गेली दोन-तीन वर्ष मी याच दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायला लागलो. सार्वजनिक पूजेच्या तिकडचा भट (किंवा भटजी, गुरुजी) याच्या पूजा सांगण्यावरूनच मी माझ्या घरी पूजा करायला लागलो!! मुलाला ते पूजा सांगणारे कधी येतायेत याच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते आले की तो मला लगेच फोन करतो.. मी लगेच बसतो आणि पूजा त्यांच्या क्लाऊड स्पीकर वरून येणाऱ्या सूचना बहुकूम पूजा करून घेतो !!

हल्ली माझ्याबद्दलचा आदर समाजात वाढलेला दिसतो. ह्यावर्षी मला चौथीपर्यंतच्या मुलांच्या घेतलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरक म्हणून बोलावंल आहे.
(वाचलेले दक्षिणेचे पैसे साठवून निदान पूजा सांगणाऱ्यांकरता योग्य प्रकारे आरत्या म्हणण्याचे आणि लाऊड स्पीकर चालवणाऱ्यांकरता साऊंड इंजिनिअरिंगचे वर्ग सुरू करावेत असं मनात आहे त्याची एक शाखा मशिदीतल्या लाऊड स्पीकरवाल्यांकरता ही पुढे मागे चालू करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी देणगी देण्यास हरकत नाही. फक्त ती रुपये पाच हजार आणि त्याच्या पटीत असावी)

हेही वाचा : “ताईचं शेपूट…”, गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडे झाली भावुक; लाडक्या बहिणीला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

vidyadhar
विद्याधर जोशींची पोस्ट चर्चेत

दरम्यान, विद्याधर जोशींच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात बाप्पा जोशींसह रितेश देशमुख, जिनिलीया आणि अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader