Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics 2024 : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अलीकडच्या काळात सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत आहेत. सध्या सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिकची चर्चा चालू आहे. विनेश फोगटने गेल्या वर्षभरात वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष केल्यानंतर महिलांच्या कुस्तीत ५० किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर संपूर्ण देशभरातून विनेशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. याशिवाय भारताचं चौथं पदक सुद्धा निश्चित झालं होतं. परंतु, सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना विनेश अपात्र ठरल्याची धक्कादायक बातमी समोर आली. यासंदर्भात आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहे.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी विनेश फोगाट अपात्र झाल्याने दु:ख व्यक्त केलं आहे. मराठी अभिनेता आस्ताद काळेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत या कुस्तीपटूला पाठिंबा दिला आहे. अभिनेता लिहितो, “मला खात्री आहे की यात कोणीही बेपर्वा नव्हतं. ना सपोर्ट स्टाफ, ना खेळाडू…मला खरंच खात्री आहे की, ही फक्त एक प्रामाणिक चूक होती. भारताने एक पदक निश्चितपणे गमावलंय…विनेश ही स्पर्धा हरली पण, तिने या क्रीडा जगतात मिळवलेला सन्मान, देशात मिळवलेला आदर ती कधीही गमावणार नाही.”

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

हेही वाचा : Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का

aastad kale
आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत ( Vinesh Phogat )

मराठी कलाविश्वात नाराजी

आस्तादप्रमाणे आणखी काही मराठी कलाकारांनी सुद्धा विनेशबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमेने विनेश अपात्र झाल्याची बातमी शेअर करत “absolutely heartbroken…” असं म्हटलं आहे. तर, ‘बिग बॉस’ फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेने “वाघीण जोमात – विरोधक कोमात” अशी मोजक्या शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय अभिनेता अभिजीत केळकरने “तुझं अपात्र होणं, जिव्हारी लागलंय” अशी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : Vinesh Phogat : “अर्धा ग्लास पाणी प्यायलात तरी वजन वाढतं, अंघोळसुद्धा…”, विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हिंदकेसरी काय म्हणाले?

hemant dhome
हेमंत ढोमेची प्रतिक्रिया ( Vinesh Phogat )

हेही वाचा : विश्लेषण : ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र कशी ठरली?

मराठी कलाकारांप्रमाणे बॉलीवूड कलाविश्वातून सुद्धा विनेश फोगाट अपात्र झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. आता स्पर्धेच्या नियमांनुसार विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. त्यामुळेच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader