अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. तर आता ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती दोघं पहिल्यांदाच एका चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. आता त्या निमित्ताने उखाणा घेत विराजसने सुभेदार चित्रपट पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

‘सुभेदार’ हा चित्रपट गेले अनेक महिने खूप चर्चेत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला या चित्रपटातून मोठ्या पाडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटातून पहिल्यांदाच मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळी हे तिघंही एकाच चित्रपटात झळकणार आहेत.

tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!

आणखी वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पुण्यात एका भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ह्या सोहळ्यादरम्यान एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विराजसने उखाणा घेतला. त्याला उखाणा घेण्यासाठी विचारलं असता आणि काही क्षण विचार केला आणि तो म्हणाला, “सुंदर शिवानी शेजारी मी दिसतो रुबाबदार, १८ तारखेला पहायला विसरू नका सुभेदार.” आता त्याचा हा उत्स्फूर्त उखाणा त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तर हा उखाणा ऐकताच बाजूला उभी असलेली त्याची बायको शिवानी आणि त्याची आई मृणाल कुलकर्णीही चांगल्याच खुश झाल्या.

हेही वाचा : “वर्षं पटापट निघून जातील आणि…” विराजस-शिवानीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवानिमित्त मृणाल कुलकर्णींनी केलेली पोस्ट चर्चेत

सुभेदार हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळी, समीर धर्माधिकारी अशी तगड्या कलाकारांची कास्ट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून आता सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader