छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमी चर्चेत असते. तिच्या अभिनयाबरोबर तिनं लिहिलेल्या कविता चाहत्यांना खूप आवडतात. त्यामुळे तिचा सध्या सुरू असलेला ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अशा सर्वगुण संपन्न असलेल्या अभिनेत्रीनं नुकताच एक खुलासा केला आहे. तिला कोणत्या गोष्टीची इनसिक्युरिटी (असुरक्षित) वाटते, यावर ती बोलली आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2 : ‘वेड’ फेम जिया शंकरची बिग बॉसमधून एक्झिट; पूजा भट्टसह टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…

‘अमुक तमुक’ या युट्यूब चॅनेलवर नुकतीच अभिनेत्री स्पृहा जोशीची मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘तुला सगळ्यात जास्त इनसिक्योरिटी कशाची आहे? किंवा तुला कशामुळे इनसिक्योर व्हायला होतं?’

हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…

या प्रश्नाचं उत्तर देताना स्पृहा म्हणाली की, “काहीच न करताना बसणं. माझ्या डोक्याला सतत काहीतरी खाद्य लागतं. नाहीतर मी विचित्र झोनमध्ये जाते. जे माझ्याबरोबर झालं सुद्धा आहे. या दिवसाचं मी काय करू? असं माझं झालंय. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं काम मी स्वतःसाठी तयार करत राहते. कोणाशी तरी बोलतं राहते. काहीतरी मार्ग शोधतं राहते.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत

पुढे स्पृहा म्हणाली की, “मला सगळ्यात जास्त इनसिक्युरिटी याची आहे की, मी काहीच करत नाही, मी फक्त घरी बसली आहे. आणि मी घरी बसले की मी फक्त झोपते. मला यात कुठलाच गिल्ट नाहीये. मी मानसिक पुणेकर आहे, मी रोज दुपारी २ ते ४ बंद असते. मग कोणीही असेल. नो एंट्री.”

Story img Loader