मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नुकतीच ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी भगवद्गीता की संविधान? यापैकी एक निवडावं लागलं तर ते काय निवडतील हेही त्यांनी सांगितलं. तसेच भारत-पाकिस्तानच्या फाळणीवरही त्यांनी भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “फालतू माणूस, ज्याची लायकी नाही…”, शरद पोंक्षेंनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “मी नथुराम गोडसेचा…”

“मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. जर मला कुणी ‘शरद भगवद्गीता की संविधान?’ असा प्रश्न विचारला, तर एका क्षणाचाही विलंब न लावता मी संविधान असं उत्तर देईन. माझी भगवद्गीता नंतर येईल, संविधान पहिलं येईल. मला संविधान म्हणायला क्षणही लागणार नाही. हाच प्रश्न तुम्ही मुसलमानाला विचारा. मी जर उद्या अमेरिकेत स्थायिक झालो, तिथलं नागरिकत्व घेतलं आणि ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे तर अमेरिकेचं संविधान, त्यांची घटना माझ्यासाठी प्रायोरिटी असेल. घरात भगवद्गीता, जय श्री राम सगळं करेन. मी जंगी देवघर बांधेन, सकाळ, दुपार संध्याकाळ मी पूजा करेन. पण बाहेर पडलो की मी अमेरिकन असेन,” असं शरद पोंक्षे म्हणाले.

हेही वाचा – “स्वतःच्या मुलीला परदेशात पाठवून हा बहुजनांच्या मुलांची माथी भडकवतोय” या टीकेवर शरद पोंक्षे म्हणाले, “ही गाढवं…”

पुढे ते म्हणाले, “याच कारणामुळे पासपोर्टसाठी हिंदुंना जगभरात कुठेही अडचणी येत नाही. हिंदू नावं दिसली की लगेच पासपोर्ट मिळतो पण खान, सय्यद अशी मुस्लीम नावं आली की थांबवतात. शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बोंबाबोंब करता, मग एकही मुस्लीम देश शांत का नाही? तिथे त्यांना मारायला हिंदू नाहीयेत ना, मग पाकिस्तान एवढं का धगधगतंय? त्यांना त्यांचा वेगळा देश हवा होता, तो घेतला ना. मग राहा की आनंदाने शांत. वेगळे झाले तरी त्यांची काही भावंडे भारतात राहिली. आमचे तिकडे जात नाहीत.”

हेही वाचा – Video: “…हे समजायची कुवत नाही समोरच्यांची”, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य चर्चेत

शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवरही भाष्य केलं. “फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात १५ टक्के हिंदू होते, ते आता फक्त अर्धा टक्का उरलेत, भारतात ८ टक्के मुस्लीम होते ते आता २३ टक्क्यांवर आलेत. तरी हिंदू राष्ट्र वाईट? हे सगळं कधी संपणार” असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी केला. “जोपर्यंत हिंदू या देशात बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच या देशात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव टिकून आहे. ज्यादिवशी हिंदू ४९ टक्के होतील आणि मुस्लीम ५१ टक्के होतील, त्यादिवशी सगळं संपलेलं असेल,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What sharad ponkshe choose between constitution and bhagavad gita talks about hindutva hrc
Show comments