मराठमोळ्या छाया कदम सध्या खूप चर्चेत आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आजवर अनेक हिंदी व मराठी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या छाया कदम यांनी ‘अंधाधून’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री तब्बूबरोबर काम केलं होतं. चित्रपटाच्या सेटवर फारसं बोलणं झालं नव्हतं, पण तब्बूने खास फोन करून कामाचं कौतुक केलं होतं, असा किस्सा छाया कदम यांनी सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील गावी असताना तब्बूचा फोन आला होता, अशी आठवण छाया कदम यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “तब्बू आणि माझ्या सेटवर फार काही गप्पा झाल्या नव्हत्या. पण जेव्हा तिने सिनेमा बघितला, फर्स्ट स्क्रीनिंग बघितलं.. मला आठवतं मी कोकणातील गावी होते. आमच्या घरी नेटवर्क नसतं. मी संध्याकाळी गावातील एका मुलाबरोबर ‘चल फिरून येऊ’ म्हणत बाईकवरून गेले. बाईकवरून जात असताना मधेच फोनला रेंज आली आणि मला एक कॉल आला.”

“घराच्या अंगणात असल्यासारखं नाचत होत्या”, Cannes मधील डान्सवर टिप्पणी करणाऱ्याला छाया कदम म्हणाल्या…

“मी फोन उचलला तर समोरच्या व्यक्तीने म्हटलं ‘हॅलो छायाजी, मैं तब्बू’ मी म्हटलं हां. ती म्हणाली ‘मैं तब्बू बोल रही हूं’ मला वाटलं तब्बू म्हणजे कास्टिंग डायरेक्टर वगैरे कुणीतरी असेल. मग मी हां बोलो म्हटलं. मग तिने सांगितलं, ‘छायाजी मैं तब्बू बोल रही हूं’. बहोत कमाल काम किया है आपने’. तेव्हा मला लक्षात आलं. मग मी त्या मुलाला म्हटलं थांब थांब जरा गाडी थांबव आणि मग तिच्याशी बोलले. ती म्हणाली, ‘बहोत अच्छा काम किया है आपने, मेरे सब दोस्त आपसे मिलना चाहते है.’ तिने चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं, त्यासाठी इनव्हाइट केलं होतं. मला हे खूप भारी वाटलं की तिने फोन केला नसता तर काही फरक पडला नसता, पण तिने एवढ्या आवडीने आणि आपुलकीने फोन करून सांगितलं. कलाकारांची यामुळेच ताकद वाढते. असा तब्बूचा किस्सा आहे,” असं छाया कदम लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

छाया कदम व तब्बू यांनी २०१८ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट ‘अंधाधून’ मध्ये एकत्र काम केलं होतं. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आप्टे, अनिल धवन, अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका होत्या. यामध्ये तब्बूने सिमी सिन्हा ही भूमिका केली होती, तर छाया कदम यांनी सखु कौरचे पात्र साकारले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When actress tabu called chhaya kadam after andhadhun movie hrc