आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या अभियनाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्याने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या सोनाली नवऱ्याबरोबर दुबईत दिवाळी साजरी करत आहे. यासंबंधीचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत; जे चांगलेच चर्चेत आले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिवाळीनिमित्ताने खास पारंपरिक लूक केला आहे. याचे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मोरपिसी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तिच्या साडीवरील डिझाइनने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनालीच्या मोरपिसी रंगाच्या साडीच्या पदरावरती देवी अंबाबाईची प्रतिकृती रेखाटली आहे. त्यामुळे सोनालीच्या या साडीची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच दुसऱ्याबाजूला अभिनेत्रीने एका नेटकरीला दिलेल्या उत्तराने देखील लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनालीच्या सुंदर फोटोवर एका नेटकरीनं विचारलं, ‘नवरा कुठे गेला?’ यावर अभिनेत्री जबरदस्त उत्तर देत म्हणाली, “मागची पोस्ट पाहा काकू, तो दिसेल.” सोनालीच्या या उत्तरानंतर नेटकरीने मात्र रागात प्रत्युत्तर दिलं. नेटकरी म्हणाली की, ‘काकू मी नाही तुम्ही…’ आता नेटकरीच्या या प्रतिक्रियेवर सोनाली काही बोलणार की नाही? हे येत्या काळात समजले.
हेही वाचा – लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करताना अक्षरा-अधिपतीमध्ये नेमकं काय घडणार? जाणून घ्या…
दरम्यान, सोनालीच्या फोटोंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव करत आहेत. काही जण तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही जण तिच्या पारंपरिक लूकविषयी बोलत आहेत.