सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये मराठीचा ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्रीने मणी रत्नम यांच्या ‘नवरस’ या तामिळ वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ‘मिमी’ या हिंदी चित्रपटामध्ये सईने महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते. या चित्रपटामधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. तिला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘पॉन्डिचेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ग्राउंड झिरो’ या तिच्या आगामी हिंदी चित्रपटामध्ये ती इमरान हाश्मीसह काम करणार आहे अशी माहिती समोर आली होती. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्यही खूप जास्त चर्चेत असते. ती सोशल माध्यमावर फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती सतत काही ना काही पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेले फोटो व्हायरलदेखील होतात. नुकताच सईने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवरुन पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा – सह-अभिनेत्रीच्या स्तनांवर हात ठेवत काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे श्रद्धा आर्या ट्रोल; अंजुम फकीह म्हणाली, “काही लोक माझ्या…”

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सई एका माणसाशी गप्पा मारत असल्याचे दिसते. तो माणूस पाठमोरा असल्यामुळे त्याचा चेहरा कॅमेऱ्यापासून लपून राहिला आहे. तिने या फोटोला “खरा खुरा कॅन्डिड फोटो. ओळखा पाहू”, असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टखाली क्रांती रेडकरने “मला माहीत आहे. खूप खूप आधी आपण त्याच्याविषयी बोललो होतो. तुझ्या डोळ्यामधील चमक सर्वकाही सांगत आहे”, अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री मनवा नाईकनेही फोटोखाली कमेंट केली आहे. कमेंट बॉक्समध्ये तिने “मला माहितीये.. मला माहितीये..”, असे लिहिले आहे. यावरुन तिच्या फोटोमधला ‘हा माणूस कोण आहे’ असा प्रश्न लोकांना पडला आहे.

आणखी वाचा – “ते स्वतः मोठे होतात आणि..” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील विनोदवीरांच्या एक्झिटवर दिग्दर्शकाने मांडले मत

सईच्या फोटोमधल्या माणसाच्या मानेवर एक विशिष्ट टॅटू आहे. या टॅटूवर हा अभिनेता प्रतीक बब्बर आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. सई आणि प्रतीक झी 5 च्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर तिने दोन-तीन दिवसांपूर्वी शेअर केले होते.