अभिनया व्यतिरिक्त कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते फोटो, व्हिडीओ किंवा रील्स सतत शेअर करत असतात. शिवाय आपली परखड मतं सुद्धा व्यक्त करतात. पण कधी कधी यामुळे ते ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या मराठी कलाकारांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी ऐश्वर्या यांनी खरं नाव का लावत नाही? याबाबत सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘पानिपत’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज दिला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं; अशी झालेली ऑडिशन

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या नेहमी सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात. अलीकडेच त्यांच्या एका रीलवर एका नेटकऱ्यानं खोचक टीका केली होती. त्याला ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. अशाप्रकारे त्यांनी स्पष्ट उत्तर ‘आस्क मी’द्वारे चाहत्यांना दिली. यावेळी चाहत्यांनी विविध प्रश्न ऐश्वर्या यांना विचारले. त्यांच्या लांबसडक केसांपासून ते पोस्टवरील प्रतिक्रिया वाचता का? अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तर ऐश्वर्या यांनी दिली.

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर ‘त्या’ रात्री लेक अभिनयची ‘ती’ कृती पाहून प्रिया बेर्डेंना मिळाली प्रेरणा; किस्सा सांगत म्हणाल्या…

एका चाहत्यानं ऐश्वर्या यांच्या खऱ्या नावाविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला की, ‘ऐश्वर्या की पल्लवी यापैकी तु्म्हाला कोणतं नाव जास्त आवडतं? आणि तुम्ही खऱ्या नावाचा वापर का करत नाही?’ यावर ऐश्वर्या म्हणाल्या की, ‘माझी दोन्ही नाव खरी आहेत.’ तसेच त्यांना दुसऱ्या चाहत्यानं विचारलं की, ‘अजून किती वर्ष तुम्ही अशा चिरतरुण दिसणार?’ यावर त्या म्हणाल्या की, ‘सारं काही मानण्यावर…’

हेही वाचा – एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं शिक्षण माहितेय? जाणून घ्या

दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. तशीच त्यांची नुकतीच ‘ताली’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमधील त्यांनी केलेल्या कामाचं सध्या कौतुक होतं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont you use your real name aishwarya narkar said on the fan question pps