अभिनेता गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. वडील, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण या ट्रोलर्संना देखील गश्मीरनं सडेतोड उत्तर दिलं आणि परखडपणे आपली बाजू मांडताना दिसला. या कठीण काळानंतर आता गश्मीर पुन्हा एकदा लवकरच जबरदस्त कमबॅक करणार आहे. सध्या त्याच काही प्रोजेक्टवर काम देखील सुरू आहे. अशातच गश्मीरला एका चाहतीनं विचारलेला अजब प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतो. यावेळी चाहते विविध प्रश्नांचा भडीमार करतात. पण चाहत्यांचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गश्मीर देत असतो. काल त्याच्या एका चाहतीनं मात्र एक अजबच प्रश्न विचारला. तरीही गश्मीरनं हा प्रश्न न टाळता त्याला उत्तर दिलं.

हेही वाचा – Video: “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं”, ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुनमध्ये नेमकं काय घडलं? पाहा

एका चाहतीनं त्याला विचारलं की, “तू इतका सेक्सी का आहेस?” यावर गश्मीर उत्तर देत म्हणाला की, “मी सेक्सी आहे असं मला वाटतं नाही. पण तुम्ही आग्रह करत असाल तर आनुवंशिकता असू शकत.”

हेही वाचा – महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातील…”

दरम्यान, गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं २०१०मध्ये सिनेक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘देऊळबंद’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला. गश्मीरनं मराठीबरोबरच हिंदीतही आपल्या अभिनयानं आणि नृत्य कौशल्यानं एक वेगळी छाप उमटवली.