केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा सध्या बोलबाला सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून महिलावर्गाचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यामध्ये महिला या चित्रपटातील गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीमध्ये केदार शिंदे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानंतर महिला कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद देत आहेत, याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.

‘मज्जा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना केदार शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, “मला एक भारी गौप्यस्फोट करायचा आहे. माझं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं होतं. मग मी पुन्हा दोन महिन्यांपूर्वी नवीन इन्स्टाग्राम अकाउंट काढलं. मी जेव्हा माझं इन्स्टा बघायचो, तेव्हा त्यामध्ये ९० टक्के पुरुष आणि १० टक्के स्त्रिया असायच्या. आणि आताच्या घडीला तो आकडा ७० आणि ३० वर आलाय. मला हे चांगलं का वाटतंय? कारण कुठलीही स्त्री रिअॅक्ट होतेय. मी कोणीतरी त्यांच्या जवळचा आहे, असा विचार करून ती रिअॅक्ट होतेय.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

हेही वाचा – Video: टोमॅटो महागल्यानं राखीनं उचललं ‘हे’ पाऊल; म्हणाली, “आता सात जन्म…”

“एवढंच नाही तर, स्त्रिया आता त्यांच्या अंतर्गत समस्या मला इन्स्टाग्रावर थेट मेसेज करून सांगतात. तेव्हा मला असं भरून येत ना. इतकं त्या आपलेपणानं आपल्याला मानतात. याचं मला आश्चर्य वाटणार नाही. कारण- जोपर्यंत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट चालत राहील, तोपर्यंत माझ्या इन्स्टाग्रामवर ९० टक्के स्त्रिया असतील आणि १० टक्के पुरुष असतील,” असं केदार शिंदे म्हणाले.

हेही वाचा – विद्या बालनचं पहिलं मानधन माहितीये? मिळाला होता ‘इतक्या’ रुपयांचा चेक

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी या चित्रपटानं तब्बल ६.१० कोटींची कमाई केली. मराठी चित्रपटाच्या इतिहासातील आजवरचं एका दिवसाचं हे सर्वाधिक कलेक्शन असल्याचं केदार शिंदेंनी सांगितलं. यापूर्वी रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटानं एक दिवसात ५.७० कोटींची कमाई केली होती.

Story img Loader