Australia Won ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने समस्त भारतीयांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. वर्ल्डकपमध्ये सलग दहा सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला शेवटच्या सामन्यात अपयश आलं. स्टेडियमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह भारतीय खेळाडूंचे डोळेही पाणावले होते. विश्वचषकाच्या या अंतिम सामन्याबद्दल आता हिंदीसह मराठी कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया बापट, सई ताम्हणकर, अमेय वाघ, अभिजीत केळकर, जुई गडकरी, केदार शिंदे, रितेश देशमुख अशा अनेक कलाकरांनी या सामन्याबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये अभिनेते हृषिकेश जोशींनी शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेते क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्याबद्दल पोस्ट करत त्यांनी आपलं मत मांडलं होतं.

हेही वाचा : “वाईट प्रतिक्रिया, बालिश मीम्स अन्…”, भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट, म्हणाला, “शेवटी हा एक…”

हृषिकेश जोशी म्हणतात, “दोन्ही टिम्समध्ये आज एकच फरक होता तो म्हणजे ‘Head’…चा! टीम ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन आणि आमच्या भारतीय संघामुळे आम्ही या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेऊ शकलो त्यामुळे त्यांचं देखील कौतुक”

हेही वाचा : “हा ऑस्ट्रेलियाचा हेड…”, भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकार झाले नाराज; सई ताम्हणकर ते अमेय वाघ यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्याची पोस्ट

दरम्यान, हृषिकेश जोशी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “आपण आज खूप चूका केल्या…”, “आज २००३ एवढं वाईट वाटलं नाही”, “आपल्या फिल्डिंगचा कोच कोण आहे ते शोधा…”, “आज एकानेच हेड वापरलं” अशा कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup india vs aus final match hrishikesh joshi shares post after team india lost final match sva 00