Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सलग १० सामने जिंकलेल्या टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव झाल्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक मराठी कलाकारांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये अभिनेता जितेंद्र जोशीने शेअर केलेल्या भावुक पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जितेंद्र जोशी आपल्या पोस्टमध्ये लिहितो, “आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट प्रतिक्रिया देतील, त्यांच्याबद्दल उलटसुलट गोष्टी बोलतील, टीका करतील. काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मीम्स बनवले आहेत. पण, या संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे कारण, एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपल्याला स्वप्न दाखवली…यंदा आपण जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला. आपण सगळे एक प्रेक्षक आणि कुटुंब म्हणून एकत्र खेळलो.”

हेही वाचा : “हा ऑस्ट्रेलियाचा हेड…”, भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकार झाले नाराज; सई ताम्हणकर ते अमेय वाघ यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

जितेंद्र जोशी पुढे लिहितो, “शेवटी हा एक खेळ आहे! कुणाला जिंकण्यासाठी कुणाला तरी हार मानावी लागते…हा दिवस आपला नसला तरी आपली टीम खूप चांगली खेळलेली आहे. आता मी खरंच दु:खी आहे पण त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सर्वांच्या वतीने ते मैदानात खेळले.”

हेही वाचा : “बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

“आपण या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही. माझ्या टीमला माझा कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्याबरोबर आहे. असो…ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन…तुम्ही आमच्यापेक्षा चांगला खेळ खेळलात!” असं जितेंद्र जोशीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.