Worli Hit And Run Case : ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणामुळे सध्या संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे या अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ५० वर्षीय प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले आहेत. तपासानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

रविवारी ( ७ जुलै ) पहाटेच्या सुमारास वरळीतील अट्रिया मॉलजवळ ही घटना घडली. यावेळी नाखवा दाम्पत्य दुचाकीवरुन प्रवास करत होतं. ससून डॉक परिसरातून मासे विकत घेऊन ते दोघंही घरी जात होते. यादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा बचावले परंतु, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी लागत होत्या. त्यामुळे या घटनेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना वाडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा : शूटिंगवेळी सलमान खानची ‘ती’ कृती अन् अभिनेत्रीने सर्वांसमोर मारलेली थोबाडीत, स्वतःच सांगितला ३० वर्षे जुना किस्सा

अभिनेते जयवंत वाडकर काय म्हणाले?

अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले, “या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणं ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव पाहिजे. आपण गाडीसमोर साधा उंदीर जरी आला तरी थांबतो त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तर तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता ही गोष्ट किती वाईट आहे. त्यानंतर गाडी तशीच सोडून पळून जाणं हे आणखी वेदनादायी आहे.”

माझा पोलिसांवर विश्वास – जयवंत वाडकर

“मी शासनाला एवढीच विनंती करेन की, कृपया या आरोपीवर दया दाखवू नका. कारण, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला, अठरा हजारांचं बिल झालं. त्यावेळी मर्सिडीज गाडी होती मग, ही बीएमडब्ल्यू गाडी कुठून आली? त्याची मैत्रीण कोण आहे. याप्रकरणी शासनाने एकालाही सोडता कामा नये. मला पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य कारवाई करतील याची खात्री आहे. अशा लोकांना सोडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कारण, सध्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्या आहेत.” असं जयवंत वाडकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?

“कावेरी माझी सख्खी पुतणी आहे. त्यामुळे याबद्दल मी अजून काय बोलू मला खरंच सुचत नाही. त्या पोरीची आता गणपतीमध्ये खूप आठवण येईल. तिने सगळं कष्ट करून हे उभं केलं होतं. त्यामुळे तिची आठवण मला कायम येत राहणार…” असं सांगत जयवंत वाडकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader