गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर एक सिनेमा येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि राज ठाकरे यांच्या सारखी वेशभूषा केलेल्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये राज ठाकरे यांच्या सारखी वेशभूषा केलेली एक व्यक्ती दिसत होती, आणि तिथे शूटिंग सुरू असल्याचेही दिसत होते. यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. त्यानंतर याच संदर्भातील एका चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये एका तरुणाची पाठ दाखवण्यात आली होती, त्याच्या जॅकेटवर “मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा” असे लिहिलेले होते. या तरुणाची ओळख प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी ठरली होती. आता यावरून पडदा उठला आहे. ‘येक नंबर’ या सिनेमात रांगड्या व्यक्तिमत्त्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा