मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी शिवसेनेला लगावलेल्या टोल्यामुळे तर कधी शिवसेना नेते उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानांमुळे ते कायमच चर्चेत असतात. जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी नेमणूक झाल्यापासून अनेक कलाकार त्यांच्याबद्दल विविध मत मांडताना दिसतात. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अनोख्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून विजय पाटकर यांना ओळखले जाते. आतापर्यंत त्यांनी अनेक प्रसिद्ध मराठी नाटकात काम केले आहे. तसेच १९८६ मध्ये त्यांनी तुझ्यावाचून करमेना या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. घोळात घोळ, एक गडी बाकी आनाडी, हमाल दे धमाल (चित्रपट), धरल तर चावतय, भुताचा भाऊ यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. फक्त मराठी नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटातही ते झळकले. गोलमाल ३, वॉटेड, अपना सपना मनी मनी, ऑल द बेस्ट यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो

विजय पाटकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच विजय पाटकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : “माझे पहिले प्रेम…” हेमांगी कवीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

त्यांनी शेअर केलेला हा फोटो एखाद्या कार्यक्रमाबद्दल असल्याचे दिसत आहे. यात विजय पाटकर हे व्यापीठावरुन भाषण करताना दिसत असून शेजारी एकनाथ शिंदे हे खुर्चीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोच्या मागे एक स्क्रीन पाहायला मिळत आहे. यावर एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो पाहायला मिळत आहे. त्यावर मला तुमचं ऐकायचंय… असा मजकूर लिहिण्यात आला आहे. एकमेकांबद्दल बोलत असतोच, एकमेकांशी बोलूयात… आपला स्नेहभिलाषी-एकनाथ संभाजी शिंदे, असे यावर लिहिण्यात आले आहे. या फोटोत विजय पाटकर हे एकनाथ शिंदेंशी काही तरी बोलताना दिसत आहे. या फोटोला त्यांनी फार हटके कॅप्शनही दिली आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीकरिता…’, असे विजय पाटकर यांनी म्हटले आहे.

विजय पाटकर यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या पोस्टमध्ये ती एखाद्या कार्यक्रमाबद्दल किंवा मोठ्या घोषणेबद्दल असावी, असा अंदाज नेटकरी लावताना दिसत आहेत. तसेच अप्रत्यक्षरित्या विजय पाटकर हे एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचेही बोललं जात आहे.