पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पालिकेच्या पायऱ्यांवरच अडवत शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुणे महापालिकेच्या जम्बो करोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी ते आले होते.

किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपानेही याप्रकरणी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावरही याप्रकरणी प्रतिक्रिया उमटत असून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली असून पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल अशी उपहासात्मक टीका केली आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

सोमय्यांना शिवसैनिकांकडून पुण्यात धक्काबुक्की

“वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

नेमकं काय झालं ?

सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

दरम्यान, जमलेले शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्यांच्या दिशेने आले. सुरक्षारक्षकांनी घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे परतताना पायऱ्या उतरताना सोमय्या खाली पडले.

या घटनेबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी आम्ही सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनीच त्यांना धक्काबुक्की केली, असा दावा केला. सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सोमय्यांचे ट्वीट

पुणे महापालिकेच्या परिसरात माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला, अशा शब्दांत ट्वीट करत सोमय्यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला केला.

जशास तसे उत्तर देऊ – चंद्रकांत पाटील

हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत. भारतीय जनता पक्ष कायद्याने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिला.