नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’ यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे. नुकताच त्यांचा ‘टाईमपास ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आपल्या करियरची सुरवात त्यांनी जाहिरात क्षेत्रापासून केली. अनेक वर्ष ते मोठ्या जाहिरात कंपनीत काम करून ते चित्रपटांकडे वळले. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसा निमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
दिग्दर्शक रवी जाधव सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या चित्रपटांबद्दल, खाजगी आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ते असं म्हणालेत ‘काल वाढदिवसाची सुरुवात ठाण्यात झाली आणि शेवट पुण्यात. आजपासून पुण्यात माझ्या नव्या हिंदी वेबसिरीजचे शुटींग सुरु होत आहे. त्यामुळे काल बाप्पाचा आशिर्वाद घेतला. काल आपण सर्वांनी ज्या शुभेच्छा पाठविल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांचा शतष: आभारी आहे. असेच प्रेम राहू द्या’.
जेव्हा शाहरुख खानने रितेशला फोन करून सांगितलं, “मी तुझ्याबरोबर…”
रवी जाधव ‘टाईमपास ३’ च्या यशानंतर आता हिंदी वेबसिरीजवर काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘बँजो’ नावाचा हिंदी चित्रपट केला होता, रितेश देशमुख त्यात मुख्य भूमिकेत होता. २०१६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता रवी जाधव पुन्हा एकदा हिंदीकडे वळले आहेत. आगामी हिंदी वेबसिरीजबद्दल त्यांनी कोणतीही माहित स्पष्ट केली नाही.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. रवी जाधव चित्रपट दिग्दर्शन, निर्मितीच्या बरोबरीने चित्रपट प्रस्तुतीच्या क्षेत्रातदेखील कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘रेगे’ या मराठी चित्रपटाची त्यांनी प्रस्तुती केली होती. रवी जाधव यांचे चाहते आता त्यांच्या हिंदी वेबसिरीजसाठी उत्सुक आहेत.