नाटककार अभिराम भडकमकर यांचे राज्य नाटय़ स्पर्धेत विजेते ठरलेले व रसिकांनीही गौरविलेले ‘देहभान’ हे २००२ साली रंगभूमीवर आलेले नाटक पुन्हा नव्या नटसंचात नाटय़रसिकांसमोर येणार आहे.
कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात ईला भाटे, राजन भिसे, बाळ बापट, प्रदीप पटवर्धन, अतुल आगलावे, शाश्वती पिंपळीकर, रेश्मा रामचंद्र, दीपक कदम या कलावंतांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात नव्या संचातील या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
नव्या संचातील ‘देहभान’चे निर्माते विजय मनोहर आहेत. बारा वर्षांनंतर पुन्हा नव्याने रंगभूमीवर हे नाटक करताना आजच्या काळाला अनुसरून कला दिग्दर्शन, रंगमंच आणि वेशभूषा या विभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत, असे सोहोनी यांनी सांगितले.
आणखी वाचा