अलीकडे नाटकवाल्यांचं सर्व लक्ष नवरा-बायकोच्या नातेसंबंधांवर केंद्रित झालेलं आहे. या विषयावर हल्ली इतकी नाटकं आलीयत की मराठी रंगभूमीवर दुसरा विषयच वर्ज्य आहे की काय असं वाटावं. अर्थात हा सनातन आणि जगाच्या अंतापर्यंत चालणारा विषय आहे, हेही खरंच. जोवर नवरा-बायको नातं अस्तित्वात आहे तोवर त्याचे काळानुरूप बदललेले पैलू साहित्य, नाटक, चित्रपटादी कलांतून येतच राहणार. अद्वैत थिएटर्स निर्मित, घन:श्याम रहाळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नाटक याच नात्याचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशाल आणि अमृताच्या लग्नाला पाच वर्षं झालीयत. विशाल एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागत असल्याने तो दिवस-रात्र कामात बिझी असतो. सुट्टीतही सतत तो लॅपटॉपवर पडीक असतो. त्यामुळे अमृता कंटाळलेली असते. ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करते. सुट्टीदिवशी तरी विशालने आपल्याला वेळ द्यावा अशी तिची अपेक्षा असते. पण वर्कहोलिक विशालला तितका वेळ नसतो. त्यावरून सतत त्यांची वादावादी सुरू असते. तशात हल्ली अमृताने आता आपल्याला मूल व्हायला हवं असा हेका सुरू केलेला असतो. पण विशाल मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. अशा बोअरिंग वैवाहिक जीवनाचं काय करायचं हे दोघांनाही समजत नाही. त्यांची मैत्रीण राणी हिची अनेक अफेअर्स झाली तरी ती लग्नबंधनात अडकून घ्यायला तयार नसते. तिचं म्हणणं, आपल्याला हवं तेव्हा अफेअर करण्याचं स्वातंत्र्य हवं… तेही केलंच लग्न, तरीही! तिचं म्हणणं या दोघांना पटतंही, आणि नाहीही पटत. तशात विशालला एका स्टार्टअपची संधी चालून येते. नोकरी सोडून हा चान्स घ्यावा का, अशी त्याच्या मनात चलबिचल होते. ही ऑफर घेऊन येणारी सावि त्याला अशी संधी पुन्हा मिळणार नाही अशी गळ घालते. पण त्यासाठी दोन कोटी रुपये त्याला उभे करायचे असतात. हे सगळं खरं तर त्याच्या आवाक्याबाहेरचं असतं. पण साविच्या आग्रहाखातर आणि तिने आपणही काही रक्कम या प्रोजेक्टमध्ये टाकायचं कबूल केल्याने विशाल हे धाडस करायचं ठरवतो. गावची वडील आणि काकांची जमीन गहाण टाकतो. या प्रोजेक्टकरता त्याला इस्रायलला जावं लागणार असतं… तिथल्या बॉसला भेटायला. मात्र, त्याआधी आपण साऊथ आफ्रिकेला जाऊ, हा अमृताचा हट्ट त्याने नाकारलेला असतो.

हेही वाचा >>> फोटोतील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्यांना ओळखलंत का? लवकरच दोघांचा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

अशा परस्परांच्या न जमणाऱ्या आवडीनिवडींमुळे आपल्या लग्नात पुन्हा जान आणण्यासाठी दोघांनी काही काळाकरता एखादं अफेअर करायचं ठरतं. आणि त्याबद्दल कुणीही कुणाला जाब विचारायचा नाही असंही ठरतं.

त्याप्रमाणे त्यांचं ‘वन नाईट स्टॅण्ड’ घडतं. त्याबद्दल एकमेकांना जाब विचारायचा नाही असं ठरलेलं असतानाही औत्सुक्यापोटी परस्परांना त्याबद्दल विचारलं जातंच. अमृताने जिम ट्रेनर सॅमबरोबर अफेअर केलेलं असतं. तर विशालचे साविबरोबर संबंध आलेले असतात. पण त्याबद्दलचा अपराधभाव दोघांच्याही मनात असतोच. त्यातून त्यांच्यातलं नातं दृढ होण्याऐवजी अधिकच ताणलं जातं. कितीही नाही गुंतायचं म्हटलं तरी अशा नात्यातदेखील गुंतणूक ही होतेच. तिचं काय? हा प्रश्न दोघांनाही भेडसावतो. त्यातून ते कसा मार्ग काढतात, त्याचंच हे नाटक.

लेखक घन:श्याम रहाळकर यांनी अलीकडे लग्नसंबंधांत आलेला ‘बोअरडम’ हा विषय यानिमित्ताने मांडला आहे. त्यातून बाहेर पडायचा आधुनिक मार्ग म्हणजे विवाहबाह्य संबंध. पण त्याने प्रश्न सुटत नाही, तर अधिकच गुंतागुंतीचा होतो. घटस्फोट हा एक मार्ग असू शकतो. पण तोही खात्रीचा नाही. लिव्ह इनचा पर्याय काही दिवस आकर्षक वाटला तरी त्यातील बांधीलकीचा अभाव आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर असुरक्षिततेची भावना जोडीदारांत जागवतोच. आणि नुसतंच मौजमजेसाठी ‘प्रकरणं’ करत राहण्यानेही प्रश्न सुटत नाही. त्यालाही सीमा आहेच. अशा विचित्र ताणलेल्या स्थितीत आजची लग्नसंस्था तिठ्यावर उभी आहे. मग करायचं काय? की लग्नाच्या वाट्यालाच जायचं नाही? अशाने समाजधारणा कशी टिकेल? हा सगळा मतमतांतरांचा गलबला लग्नसंस्थेच्या बाबतीत आज प्रकर्षाने जाणवतो आहे. आणि त्यावर हमखास उपाय काहीही नाही. ट्रायल अॅण्ड एरर मेथडने ‘हे करून बघू, ते करून बघू’ असं चाललेलं आहे. म्हणूनच आजकाल घटस्फोट, अनेेक अफेअर्स, लिव्ह इनचं प्रमाणही भरपूर वाढलेलं दिसून येतं. त्यातल्या एका पैलूला या नाटकात हात घातला गेला आहे. पण तो मार्ग यशस्वी आहे की नाही, हा परत प्रश्न आहेच. पण लेखकानं तो या नाटकात मांडला आहे. त्याचं उत्तर सकारात्मक नसलं, तरीही! यातली कोंडी आणि जगण्यातली गुंतागुंत यांचा ताळमेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्न आहे. लेखकानं सगळी पात्रं नेटकेपणाने चितारली आहेत. नातेसंबंधांतील तिढे, त्यातली असुरक्षितता, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न यांचा एक कोलाज लेखकानं रंगवला आहे. नाटकाचा पहिला प्रवेश मात्र फारच ताणल्यासारखा वाटतो. तो प्रास्ताविकादाखल असला, तरीही! दोघांची ‘प्रकरणं’ मात्र घाईघाईत घडून येतात. त्याची आगलीमागली पार्श्वभूमी न आल्याने ती स्वीकारणं जड जातं. बाकी त्यांच्यातला अंतर्गत संघर्ष योग्य प्रकारे रेखाटला गेला आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी अत्यंत सफाईनं नाटक बसवलं आहे. पात्ररेखाटन, प्रसंगनिर्मिती, पात्रांतर्गत संघर्ष, त्यांचं परस्परांतलं गुंतलेपण त्यांनी वास्तवदर्शी केलं आहे. दोघांच्या अफेअर्सचा तेवढा अपवाद! ते पचनी पाडून घेणं अवघड जातं.

संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य पात्रांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीचं निदर्शक आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून प्रसंग ठळक केले आहेत. अजित परब यांचं पार्श्वसंगीत नाटकातील मूड्स अधोरेखित करणारं आहे. मंगल केंकरे यांनी पात्रांना प्रसन्न बाह्यरूप प्रदान केलं आहे.

शुभंकर तावडे यांचा वर्कहोलिक विशाल पती-पत्नीच्या नात्यातील तणाव वाढवणारा असल्याचं योग्यरीत्या प्रस्थापित होतं. पण तो आधुनिक असण्याबरोबरच काहीसा पारंपरिकदेखील आहे. पत्नीचं प्रकरण कळल्यावर तो हायपर होतो. पण आपणही त्यातूनच गेलो असल्याची जाणीव झाल्यावर तो लगेचच शांतही होतो. राणीबरोबरचे त्याचे संबंध सामंजस्याचे आहेत. अमृताचं (प्रियदर्शनी इंदलकर) पारंपरिक असणं आणि त्याचवेळी नाइलाजानं ‘अफेअर’करण्याची विशालला मुभा देणं काहीसं खटकत असलं तरी ते स्वीकारार्ह होतं, ते लग्न टिकविण्याच्या तिच्या आंतरिक इच्छेमुळे. पण ती स्वत:ही त्याला बळी पडते हे जरासं अपचनीय आहे. तिचा बडबडा स्वभाव, नातं टिकवण्याची, मूल होण्याची आच समजण्यासारखी आहे. हे सगळे पैलू त्यांनी लीलया दाखवले आहेत. राणी झालेल्या आरती मोरे बिनधास्त, मनमोकळ्या वागतात, वावरतात. त्यांचं मुक्त वागणं त्यांनी छान प्रतीत केलं आहे. साविच्या भूमिकेत चैताली सोपारकर- कोहली बिझनेसवुमनची आकांक्षा, झटपट निर्णय घेण्याची लवचिकता सफाईनं दर्शवतात. वैवाहिक जीवनातील अपयशाचं सावट त्यांच्या वर्तनात पडलेलं जाणवतं. शौनक रमेश यांना सॅमच्या भूमिकेत फारसा वाव नाही.

लग्नसंबंधांचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवणारं हे नाटक एकदा पाहायला हरकत नाही.