अलीकडच्या काळात एखाद्या नाटकाचे हजार प्रयोग होणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षांत तर ते अशक्यप्रायच झालेलं आहे. याची कारणं तीन : एक तर त्या ताकदीची नाटकंच हल्ली लिहिली जात नाहीएत. दुसरं- प्रेक्षकांचं अवधान खेचून घेणारी इतकी विविध माध्यमं आज त्यांना सहज उपलब्ध आहेत, की त्यांना नाट्यगृहाकडे खेचून आणणं अतिशय अवघड झालं आहे. तिसरं- कलाकारांनाही नाटकापेक्षा मालिका, चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मचं अधिक आकर्षण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे फावल्या वेळात करायची गोष्ट म्हणजे- किंवा अगदीच काही हाताशी नसेल तर करायचं म्हणजे नाटक असं समीकरण कलाकारांमध्येही रूढ झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित आणि भरत जाधव यांची शब्दश: ‘चतुरस्रा’ भूमिका असलेलं नाटक ‘सही रे सही’ याचे ४४४४ प्रयोग होत आहेत हा एक विक्रमच म्हणायला हवा. एकाच कलाकाराने एकाच नाटकाचे इतके प्रयोग करण्याचाही बहुधा हा विक्रम असावा. येत्या १५ ऑगस्ट रोजी भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे ‘सही रे सही’चा हा विक्रमी ४४४४ वा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे. याच दिवशी भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ या नाटकाचा ५८ वा प्रयोग, तर ‘मोरूची मावशी’चा ८६२ वा प्रयोगही ठाकरे नाट्यगृहात सलगपणे होणार आहेत. एका कलाकाराच्या तीन नाटकांचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग हेदेखील या नाट्यमहोत्सवाचं आकर्षण असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा